मुक्ताईनगरात गावठी कट्टा : तरुणाला अटक

 

मुक्ताईनगर ः शहरातील 25 वर्षीय तरुणास गावठी कट्ट्यासह पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे. रवी उर्फ माया महादेव तायडे (मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार संतोष नागरे, देविसिंग तायडे, गोपीचंद सोनवणे, नितीन चौधरी, कांतीलाल केदारे, रवींद्र मेढे, मंगल साळुंके यांनी शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालयाच्या जवळील भोईवाड्यातून संशयीतास पाठलाग करून पकडले. आरोपीच्या अंगझडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा आढळला. कॉन्स्टेबल सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरुन रवी तायडेविरोधात आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

Copy