मुक्ताईनगरात आढावा बैठकीत अधिकारी फैलावर

MLA Chandrakant Patil’s anger over demand for bribe for government work: Officials lashed out at a review meeting in Muktainagar मुक्ताईनगर : शासकीय कामकाजासाठी आलेल्या नागरीकांकडून तहसील कार्यालयात लाचेची मागणी केली जात असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकार्‍यांची झपाई केली. या प्रसंगी शेत रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आमदारांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवार, 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता महत्वपूर्ण आढावा बैठक झाली. बैठकीत मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्याचे तहसीलदार, महसूल मंडळाधिकारी , तलाठी, जिल्हा परीषद विभागाचे अभियंते तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदारांनी केली अधिकार्‍यांची झपाई
पोट खराब क्षेत्र वहिताखाली आणून नोंद करण्यासाठी शासनाचे परीपत्रक असताना आमदारांनी मागणी केल्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने महसूल विभागाने शिबिरांचे आयोजन केले मात्र या कामाला पाहिजे तशी गती मिळाली नसल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त करीत मतदार संघातील इतर गावांच्या बाबतीत कार्यवाहीत गती आणण्याच्या सूचना केल्या तसेच मतदारसंघातील शेत रस्ते, शिव रस्त्यांबाबत कृती आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. महत्त्वाचे उतारे, ड पत्रक नोंदी, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले व इतर तत्सम दाखले नागरीकांना वेळेवर मिळत नसल्याने आमदारांनी संताप व्यक्त करीत कामांसाठी नागरीकांसाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आल्याचे आमदारांनी सांगत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली.

यांची होती उपस्थिती
बैठकीला तहसीलदार श्वेता संचेती, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, बोदवड तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या तीनही तालुक्यातील मंडळाधिकारी, तलाठी , जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.