मुक्ताईनगरातील विवाहितेचे अपहरण ; दाम्पत्यास 10 पर्यंत पोलिस कोठडी

0

मुक्ताईनगर- शहरातील 19 वर्षीय विवाहितेस नोकरीच्या आमिषाने सुरत येथे पळवून नेत तिच्या अंगावरील सात हजार 600 रुपये किंमतीचे दागिने लांबवल्याप्रकरणी संशयीत आरोपी रेखा विजय सावळे व तिचा पती विजय सावळे (दोघे रा.प्रभाग क्रमांक 12, मुक्ताईनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना रविवारी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फिर्यादी गीता भास्कर सोळंके (19, रा.प्रभाग क्रमांक 12, मुक्ताईनगर) यांना आरोपींनी उधना येथे 20 हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 13 ऑगस्ट रोजी पळवून नेत उधना येथे 3 ऑक्टोबरपर्यंत डांबून ठेवले. याच दरम्यान तिच्या अंगावरील सात हजार 600 रुपये किमतीचे दागिने खोटे बोलून विश्वासघाताने काढून घेण्यात आले होते. तपास पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहेत.

Copy