Private Advt

मुक्ताईनगरातील अजय जैन यांना अटकेपासून तूर्त दिलासा

भुसावळ : मुक्ताईनगर शहरातील शिवसेना व राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांमध्ये झालेल्या वादानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संशयीत शिवाजीराव पाटील व अजय जैन यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी अजय जैन यांना तूर्त अंतरीम अटकपूर्व जामीन 1 जानेवारी 2022 पर्यंत मंजूर केला आहे. अजय जैन यांच्यातर्फे अ‍ॅड.तुषार पाटील यांनी कामकाज पाहिले.