Private Advt

मुक्ताईनगराजवळील अपघातात धुळ्यातील चौघांचा तर जळगावातील एकाचा मृत्यू

मुक्ताईनगर : भल्या पहाटे टाईल्सने भरलेल्या ट्रकने रस्त्यात उभ्या असलेल्या दुधाच्या टँकरला धडक देवून झालेल्या अपघातात धुळ्यातील चौघांसह जळगावातील एकाचा मृत्यू झाला. या विचित्र अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. मुक्ताईनगर-मालकापूर रोडवर घोडसगाव जवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

चार विाहनांचा विचीत्र अपघात
अपघातग्रस्त वाहनांमध्ये क्रेन क्र. एम.एच.18- बी.आर-6831, टँकर क्र. जी.जे. 02 डब्लु 8887, टँकर क्र. जी.जे 02 एक्स.एक्स. 9759 व ट्रक क्र. जी.जे. 36 व्ही. 8939 या चार वाहनांचा अपघात घडला.

पाच जणांचा जागीच र्मत्यू
अपघातातील मयतांमध्ये पवन सुदाम चौधरी (25), धनराज बन्सीलाल पाटील (48, बिलाडी, ता.जि.धुळे), भालचंद्र गुलाब पाटील (31, रा.बिलाडी, ता.धुळे), उमेश राजेंद्र सोळंके (35, धुळे), धनराज सुरेश सोनार (37, जळगाव) यांचा मृत्यू झाला.

सहा जण जखमी
या अपघातात विजय अनिल पाटील (26, बिलाडी, ता.जि.धुळे), मुरलीधर प्रल्हाद काबरे (51, नशिराबाद) , चालक गुड्डु उर्फ अजित हरिशंकर यादव (35, यु.पी.) , परवेज खान तरबेज खान (28, प्रतापगड यु.पी.) , कांतीलाल शांतीलाल ठाकरे (43, जळगाव) , ओम गेंदीलाल ठाकरे (14, जळगाव) हे जखमी झाले.