मुकेशभाई आर. पटेल मिलीटरी स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

0

शिरपूर- विलेपार्ले केलवणी मंडळ मुंबई संचलित मुकेशभाई आर. पटेल मिलीटरी स्कूल व कनिष्ठ महाविदयालय तांडे, शिरपूर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती दिपश्री गोसावी यांनी केले. शाळेतील शिक्षक मनोज बहारे यांनी शिवरायांचे विचार आजच्या समाजात कसे उपयोगी पडतील याबद्दल विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी शिवरायांच्या जीवनाबद्दल सविस्तर विवेचन केले. विदयार्थ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच कॉपीमुक्त अभियान याची उदिष्टये सांगून ते कशा प्रकारे गैरमार्गापासून वंचित राहतील, शाळेची उज्ज्वल परंपरा कशी टिकवून ठेवतील याबद्दल उदबोधन केले. शिवजयंतीचे औचित्य साधून दहावी व बारावीच्या विदयार्थांसाठी उदबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. एन.एम.आय.एम.एस. सावळदे कॅम्पस येथील प्रा.भुपेश जावरे यांनी बारावी नंतर करिअरच्या संधी, पाऊलवाटा कोणत्या व विद्यार्थानी काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले. यतिन पाटील यांनीही कॉपीमुक्त अभियानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.