Private Advt

मुकूंद नगरात जुना वाद उफाळला : दाम्पत्याला मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

जळगाव : जुना वाद उकरून काढत तिघांनी दाम्पत्यास मारहाण केल्याची घटना शहरातील मुकुंद नगरात घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
रंजनाबाई युवराज महाजन (42, हरीविठ्ठल नगर रोड, मुकुंद नगर, जळगाव) या आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. बुधवार, 11 मे रोजी रात्री 7 वाजता रंजनाबाई महाजन या घरी बसल्या असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्या गल्लीत राहणारे नामदार तडवी (पूर्ण नाव माहीत नाही), शेखर नामदार तडवी आणि मनीषा शेखर तडवी (सर्व राहणार मुकुंदनगर) या तिघांनी रंजनाबाई महाजन यांच्यासह त्यांचे पती योगराज महाजन यांना बुक्क्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली. या मारहाणीत मनीषा तडवी हिने रंजनाबाई महाजन यांना वीट मरून फेकल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, रंजनाबाई महाजन यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी नामदार तडवी, शेखर नामदार तडवी आणि मनीषा शेखर तडवी यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गबाले करीत आह