मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांवर गुन्हा दाखल करा – एकलव्य आदिवासी क्रांतीदल

0

जळगाव: कवितेत आदिवासी मुलींवर अश्लील लेख लिहून संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून कवी दिनकर मालवनसह कवितेला मान्यता देनाय्त मुंबई विद्यापीठाचे सचिव कुलगुरू यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांतीदलतर्फे करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी तीस ते चाळीस आदिवासी महिलांनी कवी दिनकर मालवनसह सचिव कुलगुरू यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केलेली होती़ यावेळी अरूण मोरे यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुनील गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना गुन्हा करण्यात यावा, याबाबत निवेदन देण्यात आले़ याप्रसंगी आदिवासी महिला निवेदन देताना उपस्थित होत्या.