मुंबई, पुण्यातील रहिवाशांना अन्य जिल्ह्यात नो एन्ट्री

0

मुंबई । मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतील रहिवाशांना राज्यातीलच अन्य जिल्ह्यात जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु, मजूर व इतर कामगार हे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकतात.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून कामगार, मजुरांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता करावा लागणार आहे. सर्व पोलीस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठवली जाईल. अर्जाची छाननी करुन नियमानुसार आणि तेथील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही करण्याचे धोरण शासनाने निश्‍चित केले आहे.

Copy