मुंबई – पुणे मार्गावर अपघात; २ ठार, ३ जखमी

0

कामशेत : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुणे मुंबई लेन वर थांबलेल्या डंपर गाडीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुंबईच्या दोन जणांचा मृत्यू झाला तर ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि. ३ रोजी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर पिंपलोळी गावाच्या हद्दीत पुणे मुंबई लेनवर किलोमीटर नं . ६९/४०० जवळ थांबलेला डंपर ( एम एच १६ ए वाय ८९६९ ) ला पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा टीयुव्ही ३०० ( एम एच ०४ जी डी ९७९१ ) ची चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती डंपरवर पाठीमागून धडकली. या अपघातात महिंद्रा गाडीतील जावेद इस्माईल शेख ( वय ४० रा.कुर्ला ) इस्माईल शेख ( वय ६५ रा. कुर्ला ) यांचा जागीच मृत्यु झाला असुन इतर तीन जण किरकोळ जखमी झाली आहेत. त्यांची नावे अद्याप समजली नसून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Copy