मुंबई-नागपुर दुरांतो आता दररोज धावणार

भुसावळ : रेल्वेने खालील विशेष गाड्यांच्या सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ट्रेन क्रमांक 02189 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपुर दुरांतो विशेष गाडी 16 जूनपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. ट्रेन क्रमांक 02190 नागपूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो विशेष गाडी 15 जूनपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज नागपूर येथून सुटेल. या गाड्यांचा मार्ग, वेळ आणि थांबे यात कोणताही बदल राहणार नाही. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानावर कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.