मुंबई ते पाटणा-रक्सौल दरम्यान विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

भुसावळ : 03260 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पाटना द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष सेवा (मंगळवार व शुक्रवार) 6 एप्रिल ते 2 जुलैपर्यंत चालवण्यात येणार आहे. 03259 पाटना-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष सेवा (बुधवार व रविवार) 4 एप्रिल ते 30 जूनदरम्यान चालवण्यात येणार आहे. 02546 लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल अतिजलद साप्ताहिक विशेष (शनिवार) सेवा 3 एप्रिल ते 26 जूनदरम्यान चालवण्यात येणार आहे. 02545 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद साप्ताहिक विशेष (गुरुवार) गाडी 1 एप्रिल ते 24 जूनदरम्यान धावणार आहे. 05548 लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल साप्ताहिक विशेष (बुधवार) गाडी 7 एप्रिल ते 30 जूनदरम्यान चालवण्यात येणार आहे. 05547 रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (सोमवार) गाडी 5 एप्रिल ते 28 जूनदरम्यान चालवण्यात येणार आहे. 05268 लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल साप्ताहिक विशेष गाडी 5 एप्रिल ते 28 जूनदरम्यान धावणार आहे. 05267 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (शनिवार) गाडी 3 एप्रिल ते 26 जूनदरम्यान धावणार आहे. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

Copy