मुंबई ते नागपूर दरम्यान विशेष उत्सव ट्रेन

0

एलटीटी-लखनऊ व प्रयागराज दरम्यान विशेष गाड्या धावणार

भुसावळ: मध्य रेल्वेला प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते नागपूर दरम्यान उत्सवासाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून धावणार विशेष ट्रेन अप 02048 सुपरफास्ट विशेष उत्सव ट्रेन 13 रोजी नागपूर येथून सहा वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 7.45 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02047 सुपरफास्ट विशेष उत्सव ट्रेन 15 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रात्री 11.30 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 1.15 वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.

या स्थानकावर गाडीला थांबे
या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि दादर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, सात शयनयान आणि चार द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना या गाडीत प्रवासाची परवानगी मिळणार असून प्रवाशांना कोविड नियमांचे पालन करावे लागणार आहे.

भुसावळ रेल्वेला प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ आणि प्रयागराज दरम्यान उत्सवासाठी विशेष उत्सव गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. डाऊन 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ उत्सव विशेष गाडी 16 डिसेंबर ते 30 जानेवारीदरम्यान दर सोमवार, बुधवार शनिवारी प्रस्थान स्टेशनहून 4.25 वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी लखनऊ स्टेशन 3.30 वाजता पोहोचणार आहे. अप 02108 लखनऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी 17 डिसेंबर ते 31 जानेवारीदरम्यान दर मंगळवार, गुरुवार, रविवारी प्रस्थान स्टेशनहून 10.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला 9.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, भोपाल, ललितपूर, झांशी, ओरा, कानपुर सेंट्रल रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी टू टायर, चार एसी थ्री टीयर, 12 स्लीपर क्लास, तीन सेकंड क्लास सीटींग बोगी जोडण्यात येणार आहे.

डाऊन 02153 लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज उत्सव विशेष गाडी 15 डिसेंबर ते 26 जानेवारीदरम्यान दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहून 4.30 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रयागराज स्टेशन 4.40 वाजता पोहोचणार आहे. अप 02154 प्रयागराज लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी 16 डिसेंबर ते 26 जानेवारीदरम्यान दर बुधवारी प्रस्थान स्टेशनहून सात वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन 4.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरीया, नरसिंहपूर, जबलपुर, कटनी, मैहर, सतना रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक फर्स्ट एसी, चार एसी टू टीयर, 13 एसी थ्री टीयर, एक पँट्री कार बोगी जोडण्यात येणार आहे. आरक्षित गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश दिला जाणार असून कोविड नियमांचे पालन करावे लागणार आहे.

मुंबईसह हावडा व रांची दरम्यान विशेष रेल्वे
भुसावळ रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी मुंबई व हावडा तसेच रांची दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अप 02260 हावडा-मुंबई विशेष गाडी 14 डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशनहुन दोन वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबई स्टेशनवर 9.20 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02259 मुंबई-हावडा विशेष गाडी 16 डिसेंबरपासून दररोज प्रस्थान स्थानकापासून सहा वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी हावडा स्टेशनवर 12.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, नागपूर वर्धा, नागपूर, भंडारारोड, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडकपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन द्वितीय वातानुकूलित तसेच 13 शयनयान, दोन द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार असणार आहे.

डाऊन 08610 विशेष गाडी 18 डिसेंबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शुक्रवारी 4.40 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी रांची येथे 06.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 08609 रांची-एटीटी एक्स्प्रेस 16 डिसेंबरपासून रांची येथून दर बुधवारी 9.05 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 07.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इटारसी, पिपरीया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जंक्शन, वाराणसी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, भभुआ रोड, सासाराम, डेहरी ऑनसोन, अनुग्रह नयन रोड, गया, कोडरमा, हजारीबाग रोड, एनएससी बोस जंक्शन गोमोह, चंद्रपुरा जंक्शन, राजाबेरा, बोकारो स्टील सिटी आणि मुर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 13 शयनयान, तीन द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 02259 व 08610 चे विशेष शुल्कासह बुकींग 12 डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणिुु रेल्वे संकेतस्थळावर सुरू झाले आहे. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

Copy