मुंबईत १५ जुलै पर्यंत संचारबंदी लागू !

0

मुंबई:- राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मुंबईत १५ जुलै पर्यंत संचारबंदी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १ जुलै मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

तसेच यापूर्वीप्रमाणे रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना यादरम्यान प्रवासाची मुभा असेल. तसेच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

Copy