मुंबईत महिलेचा गळा चिरुन हत्या

0

मु्ंबई : वांद्रयांत पैशांच्या वादातून एका महिलेचा गळा चिरुन हत्या झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे पश्चिम भागात लव्हली स्टोअरसमोर रिलायबल कन्स्ट्रक्शनचा रिकामा प्लॉट आहे. या प्लॉटवरील पत्र्याच्या रिकाम्या शेडमध्ये खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी सांगितलं आहे की, अर्चना नावाच्या साधारण ४० ते ४५ वर्षं वयाच्या महिलेचा खून झाला आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Copy