मुंबईत पार्किंगची कंत्राटे महिला, बेरोजगार युवा वर्गाला

0

मुंबई : पालिका क्षेत्रात विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या वाहनाने आवागमन करित असतात. हे करित असताना या वाहनांचे पार्किंग योग्य ठिकाणी करणे, हा दिवसेंदिवस एक जटील प्रश्न बनत चालला आहे. याच प्रश्नाचा नकारात्मक फायदा घेण्याचा व महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने वाहनतळ शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत होत्या. मात्र वाहनतळांची क्षमता, वाहनांच्या वर्गवारीनुसार आकारण्यात येणारे शुल्क इत्यादींचा तपशिल वाहनळांवर उपलब्ध नसल्याने या बाबत कारवाई करण्यात स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीसांना कारवाई करण्यात अडचणी येत होत्या.

पालिका क्षेत्रातील सशुल्क वाहनतळांसाठी सुधारित धोरण लागू केले आहे. या धोरणाचा मसूदा पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सुधारित धोरणानुसार ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात यावी, यादृष्टीने निविदा प्रक्रियेमध्ये काही सुनिश्चित बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रामुख्याने एकूण वाहनतळांच्या 50 टक्के वाहनतळ हे महिला बचत गटांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर उर्वरितपैकी 25 टक्के हे नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार संस्थांसाठी, तर खुल्या गटासाठी 25 टक्के वाहनतळ असणार आहेत.

रस्त्यावरच्या निर्देशित वाहनतळांवर पिवळे पट्टे आखून सदर जागा वाहनतळासाठी असल्याचे संबंधितांच्या लक्षात यावे. त्याचबरोबर या पिवळ्या पट्ट्याच्या आत वाहन उभे करणेही आवश्यक असणार आहे. सर्व वाहनतळांवर 6 फूट ु 5 फूट या आकाराचे दोन फलक लावणे बंधनकारक. या फलकांवर वाहनतळाचे दरपत्रक, वाहनतळाची क्षमता, कंत्राटदाराचे नाव व काही तक्रार करावयाची असल्यास तक्रारीसाठीचा दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशील असणे बंधनकारक असणार आहे. सर्व वाहनतळांवर मासिक पासची सुविधा त्या-त्या वाहनतळांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसेस यासाठी विशेष सवलतीचे दर
बांधकाम विषयक तरतूदींद्वारे महापालिकेला प्राप्त होणा-या मपब्लिक पार्किंग लॉटफ आधारित पार्किंग सुविधेचा वापर करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यासाठी याबाबत विशेष सवलतीच्या दरात (50 टक्के) मासिक पास उपलब्ध करुन देण्याची तरतूद सुधारित धोरणामध्ये आहे. परिणामी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच उपलब्ध असलेल्या मपब्लिक पार्किंग लॉटफ जवळील रस्त्यांवर सुमारे 500 मीटरच्या परिघामध्ये वाहने पार्किंग करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.