मुंबईतील 500 इमारती धोकादायक

0

मुंबई : मुंबईतील सुमारे 500 इमारतींना मुंबई महापालिकेने धोकादायक ठरवले असून त्या इमारती पावसाळ्याआधीच रिकामे करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. काही इमारतींच्या विरोधात महापालिकेने न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मुंबईत 27 एप्रिल 2017 रोजी 816 इमारती धोकादायक असल्याचे म्हटले होते. ज्यामध्ये कुर्लातील 113, घाटकोपरमधील 80 आणि वडाळ्यातील 77 इमारतींचा समावेश आहे. ही आकडेवारी पाहता महापालिका यातील 196 इमारती पाडणे आणि रिकामे करणे यात यशस्वी झाली आहे.

काही प्रकरणात रहिवाशांनी न्यायालयात जावून स्थगिती आणली आहे. यासाठी मनपाची न्यायालयाची विशेष फळी काम करत आहे. महापालिका सी1, सी2 आणि सी3 अशा पद्धतीने धोकादायक बांधकामांचे वर्गीकरण करते, त्यात बांधकाम दुरुस्त करण्यालायक असणार्‍या काही इमारतींनाच केवळ सी3 दर्जा देण्यात आला आहे. तर दुरुस्त न होणार्‍या बांधकामांना त्या-त्या परिस्थितीनुसार सी2 आणि सी3 दर्जा देण्यात येत आहे. महापालिका 134 इमारती 31 मेपर्यंत रिकामे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.