मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

0

पुणे-मुंबई पोलिसांच्या सेवेत असणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकाने पुण्यातील संगम पुलाजवळील धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करीत आहेत.

साजन शंकर सानप (वय 37 वर्ष) असे पोलीस उपअधीक्षक यांचे नाव आहे.  आज मंगळवारी  सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Copy