मुंबईतल्या सेना-भाजपा युतीचा आठ जिल्ह्यात विस्तार

0

मुंबई : कॉग्रेसशी हातमिळाणी केल्याने राष्ट्रवादी १७ जिल्ह्यात सत्तेत सहभागी होऊ शकते, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडल्यावर शिवसेना भाजपा यांचे डोळे उघडले आहेत. आधिकाधिक जिल्ह्यात सत्ता बळकावण्यासाठी मुंबई नंतर अ्न्य जिल्ह्यात एकत्र येण्याचा निर्णय होऊ घातला आहे. काही जिल्ह्यात सेना वा भाजपाने स्वबळावर बहूमत मिळवले आहे. पण तसे पाच जिल्हे असून एकत्र आल्यास आणखी आठ जिल्ह्यात युती सत्ता काबीज करू शकते, असे मानले जात आहे.

जळगाव, लातूर, वर्धा व चंद्रपूर येथे भाजपाने तर रत्नागिरीत सेनेने स्वबळावर बहूमत संपादन केले आहे. तिथे त्यांना एकहाती सत्ता राबवता येईल. पण जिथे तसे झालेले नाही, अशा आणखी आठ जिल्ह्यात युती सत्तेत येऊ शकणार आहे. तिथे आपसातले मतभेद विसरून सत्ता काबीज करण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. मुंबईमुळे युतीमध्ये वितुष्ट आले होते. पण भाजपाने मुंबईचा हट्ट सोडला आणि पुन्हा एकत्र येण्याचा युतीपक्षांचा मार्ग मोकळा झालेला आहे.

मुंबई शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेणार्‍या भाजपाच्या कोअर समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होऊन, त्यात हा निर्णय झाला आहे. त्या विषयात लौकरच सेनेशी प्रातिनिधीक बैठकी होतील. मुंबईत सेनेचा महापौर झाल्याने सेनेतील कटूताही खुप कमी झालेली आहे. आता त्यामुळेच पुन्हा युतीत खेळीमेळीचे प्रसन्न वातावरण तयार होत असल्याचेही सुत्रांनी सांगितले.