मुंबईच्या महापौरांना कोरोनाचा संसर्ग

0

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांनी घरीच आयसोलेट करून घेतले आहे. संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महापौरांच्या घरातील सदस्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अहवाल अद्याप आलेले नाही.

सुरुवातील मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झाला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असून पूर्वीपेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत.