मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, हे पद मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो

कोल्हापूर – मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, हे पद मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो, त्यांनी स्वतःहून मला हे पद सन्मानाने दिलं आहे अशा शब्दात संभाजीराजे यांनी भाजपा प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. नुकतेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजें संभाजीराजे मान्य करत नसले, तरी ऑन पेपर ते भाजपाचेच खासदार आहेत असं म्हटल होत.

माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला. कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू द्या. मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे, पण खासदारकी मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते स्वतः माझ्याकडे आले होते. त्यांनी मला सन्मानपूर्वक हे पद दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकच करतो,” असं म्हणत संभाजीराजे यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली