मी मिसेस मुख्यमंत्र्यांचा ऐकतो, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरांचा ऐका आणि घरीच रहा; उद्धव ठाकरेंचा संदेश

0

मुंबई: कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. भारतात रुग्णसंख्या ६०० च्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्रात ११२ पर्यंत हा आकडा गेला आहे. दरम्यान आज बुधवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी मिसेस मुख्यमंत्र्यांचा ऐकून घरीच थांबलो आहे, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचा सल्ला ऐका आणि घरीच रहा असा मिश्कील संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांनी करोना म्हणजे हे जागतिक युद्ध आहे आणि या युद्धाची सर्वांना चांगलीच कल्पना आली आहे. या संकटाशी सामना करायचा असेल तर घरातच राहा. एसी बंद करा. खिडक्या उघडा. घरात मोकळी हवा येऊ द्या, असं सांगतानाच गुढी पाडवा आज आपल्याला जल्लोषात साजरा करता आला नाही. हरकत नाही. आपण गुढी पाडवा जरूर साजरा करू. या संकटावर मात करून करून आपण विजयाची गुढी नक्कीच उभारून, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

Copy