मी तिच्यासारखी कधीच होऊ शकत नाही – जान्हवी कपूर

0

मुंबई : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणी आजही कायम आहेत. कपूर कुटुंबीयला श्रीदेवींची कमतरता भासत राहते. गोव्यात सध्या आतंरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे. या कार्यक्रमात जान्हवी कपूर श्रीदेवींच्या आठवणीत भावूक झाली.

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने ‘धडक’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटातून तिने दमदार यश आणि लोकप्रियता मिळवली. मात्र, मी माझ्या आईसारखी कधीच होऊ शकत नाही, असे ती या कार्यक्रमात म्हणाली.

‘२०१८ हे वर्ष माझ्यासाठी वाईट आणि चांगल्या गोष्टी एकाच वेळी घेऊन आले. हे वर्ष माझ्यासाठी अनामिक घटनांचं ठरलं. आमचं कुटुंब आता एकत्र झाले आहे. त्यात आनंद आहे. पण, जे काही घडलं, ते पचवण्यासारखं नव्हतचं. आम्ही आजही त्या धक्क्यातून सावरलेलो नाही. सर्वांनी आम्हाला जे प्रेम दिलं, त्यांची मी फार आभारी आहे. मला काम करण्याची संधी मिळाली. माझ्या आईवडीलांना माझा गर्व वाटावा, हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे’, असे जान्हवी या कार्यक्रमात म्हणाली.