Private Advt

मी केवळ पालखीचा भोई आहे, ज्यांच्यामुळे मी टाकीचे घाव सोसून मोठा झालो त्या सर्वांचा हा गौरव आहे.- अभिनेते विजय कदम

मुंबई : पुरस्कार घेण्यासाठी मी जरी आलो. पण खरं सांगू का? मी पालखीचा भोई म्हणून आलो आहे. ज्या कामगार वस्तीत मी राहिलो. ज्या शिरोडकर शाळेत मी शिकलो. टाकीचे घाव सोसत ज्यांच्यामुळे मी घडलो त्या सर्वांचा हा गौरव आहे अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त करीत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी एकता अकादमीचा जीवन गौरव स्वीकारला.

कमलाकर सारंगांपासून विजया मेहता, पुरुषोत्तम बेर्डे, रत्नाकर मतकरी, विजय पाटकर या दिग्दर्शकांनी, आणि ज्या ज्या कलावंतांनी तहान लाडू, भूक लाडू देवून मला घडवले, त्या सर्वांचा हा गौरव आहे, !!असेही यावेळी म्हणाले.

 

शनिवारी गिरगाव साहित्य संघात एकता पारितोषिक वितरण व पुरस्कार सोहळा संपन्न झाला.ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना यंदाच्या एकता कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अभिनेत्री प्रज्ञा जाधव यांना अभिनयासाठी प्रिया तेंडुलकर स्मृती पुरस्कार, साहित्यासाठी इकबाल मुकादम यांना दया पवार स्मृती पुरस्कार, वैभव साटम यांना नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार, शिरीष नाडकर्णी यांना महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृती पुरस्कार, मनोज आचार्य यांना संगीत क्षेत्रामधील योगदानाकरिता सुधीर फडके स्मृती पुरस्कार, पत्रकारितेसाठी प्रसाद जोशी यांना जयंत पवार स्मृती पुरस्कार, विजय साखळकर यांना नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार ,विद्या प्रभू – शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्री बाई फुले स्मृती पुरस्कार, कादंबरी वाझे सुबल सरकार स्मृती नृत्य पुरस्कार, कमलाकर राऊत यांना प्रबोधन ठाकरे स्मृती समीक्षा क्षेत्रातील पुरस्कार,

आकाश घरत यांना व्ही. शांताराम स्मृती लोकजागर पुरस्कार, तसेच समाजसेवेचे पुरस्कार प्रशांत देशमुख -( संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार), हर्षद आचार्य – ( मास्टर दत्ताराम स्मृती पुरस्कार), संदेश निकम – ( डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार), सतीषकुमार साळुंके- ( महात्मा जोतिबा फुले स्मृती पुरस्कार), सुरज भोईर- (बिरसामुंडा स्मृती पुरस्कार), चंद्रकांत करंबळे- (बाबा आमटे स्मृती पुरस्कार), मगन बी. सोलंकी – (दादासाहेब गायकवाड स्मृती पुरस्कार), अश्र्विनी कांबळे – ( बाळाराम रामा कासारे स्मृती पुरस्कार),सोमनाथ ओझर्डे – (वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार) गौरव प्रदान करण्यात आले.

 

डेप्युटी चिफ इंजिनियर मुंबई उपनगरे-१ अभिनेते उल्हास महाले, प्रमोद पवार, कवी अजय कांडर, अनिल सुतार, सदानंद राणे, रमेश यादव, वैशंपायन गमरे, उज्जय आंबेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव, सूत्रसंचालन प्रा. अवधूत भिसे तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव कवी प्रकाश पाटील यांनी केले.