मी कधीही म्हणलो नाही मला जाणता म्हणा; साताऱ्यात पवारांचे वक्तव्य !

0

सातारा: भाजपच्या कार्यालयात ‘कल के शिवाजी आज के मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावरून देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. विरोधक भाजपवर आरोप करत असताना भाजपकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले जात आहे. कालच भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावर आक्षेप घेतले. दरम्यान आज बुधवारी शरद पवार यांनी उदयराजे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मी कधीही कोणाला मला जाणता राजा म्हणा असे म्हटले नाही, असे शरद पवारांनी सांगितले. सातारा येथे साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उदयनराजे यांच्याबद्दल बोलण्याची मला आवश्यकता नसून आमचे नेते रामराजे निंबाळकर हेच त्यांच्यासाठी पुरे आहेत असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

शिवाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासला तर छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवछत्रपती हीच उपाधी देण्यात आली असून जाणता राजा असा त्यांचा उल्लेख काही पुस्तकातच करण्यात आल्याचेही शरद पवार यांनी म्हटले.

Copy