‘मीस यु डॅड मॉम’चे स्टेटस ठेवल अन् काही वेळाने तरुणाचा मृत्यू

0

जळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना रितसर प्रशासनाची परवानगी घेऊन राजस्थानात सोडायला गेलेल्या उमेश बाबुलाल प्रजापत (28,रा.आयोध्या नगर)या तरुणाचा ट्रॅक्टर-कार अपघातात मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोन वाजता धार धामनोड या मार्गावर हा अपघात झाला. अपघाताच्या तीन तासापूर्वीच उमेशने त्याच्या व्हॉटस्अ‍ॅपवर आई, वडीलांचा कारमधील फोटो अन् त्याखाली मिस यू डॅड मॉम अस स्टेटस ठेवल होते. अन् अंतर प्रवास केल्यावर अपघातात त्याचा मृत्यू झाला.

ट्रॅक्टर कारमध्ये धडक
उमेश हा कारने (क्र.एम.एच.19 ए.पी.8488) राजस्थानात गेला होता. ही कार घेऊन तो राजस्थानात प्रवाशी सोडायला गेला होता. तेथून परत येत असताना धार-धामनोड रस्त्यावर ट्रॅक्टर व कारची धडक झाली. त्यात कारचा चुराडा झाला असून उमेश जागेवरच गतप्राण झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. उमेश हा आयएमआर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. सध्या तो फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता. वडीलांचे केटर्सचा व्यवसाय असून किरण केटर्स नावाने त्यांची फर्म आहे. उमेश याचे आई, वडील राजस्थानात गेले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भाऊ तातडीने रवाना झाला. पत्नी गृहीणी असून त्यांना एक दीड वर्षाची मुलगी आहे.

Copy