“मिशन साहसी” अभियान अंतर्गत विद्यार्थिनींना देण्यात आले स्व-संरक्षणाचे धडे

0

जळगाव: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या वर्षी संपूर्ण देशभरात मिशन साहसी या अभियान द्वारे विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज अभाविप शाखा: जळगाव च्या वतीने एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे सकाळी ०७:३० ते ०९:३० या वेळात विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यात आले. उद्घघाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा.महापौर सिमाताई भोळे, कार्यक्रम अध्यक्ष प्रा.डॉ. संजय शेखावत, महानगरमंत्री रितेश चौधरी, प्रशिक्षक पोलीस नाईक विनोद अहिरे, प्रा.अर्चना भावसार, अभियान प्रमुख श्रुती शर्मा, कार्यक्रम प्रमुख अंजली लोथे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रुती शर्मा हिने केले, महिलांनी कणखर बनले पाहिजे व आत्महत्या कडे प्रवृत न होता समस्यांना सामोरे गेले पाहिजे यातुनच मार्ग सापडतील असे मत महापौर सिमा भोळे यांनी व्यक्त केले, विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण संपूर्ण देशभारत देण्यात येत आहे ही गौरवाची बाब आहे, आज महिला सर्व क्षेत्रात आपली भूमिका पारपाडत असताना त्यांनी आत्मसंरक्षणासाठी सदैव तयार असले पाहिजे असे मत अध्यक्षीय भाषणात प्रा. संजय शेखावत सरांनी व्यक्त केले, आभार रितेश चौधरी यांनी मांडले या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copy