मिलिंद सोमणने डिलीट केले लाखो फॉलोर्वस असलेले टिक-टॉक अकाऊंट

3

मुंबई – अभिनेता मिलिंद सोमणने आपले टिक-टॉक अकाऊंट डिलीट केले आहे. मिलिंदने ट्विटरवर प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर Boycott Chinese Products ही मोहीम सुरु केली आहे. भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास सर्वात आधी चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय सैन्य चीनला गोळ्यांनी म्हणजेच बुलेट्सने उत्तर देत असतानाच मुंबई, दिल्ली, बेंगळूरूबरोबरच देशातील सर्व भागांमधील नागरिकांनी चीनला पाकिटातून म्हणजेच वॉलेटच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे असे मत वांगचुक यांनी व्यक्त केले आहे.

Copy