मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू

0

जळगाव : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या अभिषेक नंदलाल मौर्य वय २७ रा. मंगलपुरी महाराज नगर, रामेश्वर कॉलनी या विवाहित तरुणाचा मेहरून तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

अभिषेक मौर्य हा सोमवारी त्याच्या तीन मित्रांसोबत मेहरूण तलावावर पोहण्यासाठी गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक खोल पाण्यात तो बुडाला. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद आसीम तडवी, सचिन पाटी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

या तरुणांनी काढला तलावातुन पाण्याबाहेर मृतदेह
पोलिस कर्मचाऱ्यांनी बुडालेल्या अभिषेकला काढण्यासाठी पट्टीच्या पोहणार्या तरुणांना संपर्क साधला. त्यानुसार राजेंद्र श्रावण शेजवळ रा. रामेश्वर कॉलनी, सलमान खान युसूफ खान, रा. रामनगर , किरण जगदीश नाईक, रा. मेहरून , भूषण श्याम तायडे, रा. जळगाव, रामदास शिवाजी भोस, रा. रामेश्वर कॉलनी, निलेश गोविंदा पाटील, रा. जळगाव या तरुणांनी अभिषेक याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तो जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. प्रकाश न्हावी यांनीही त्यांच्या वाहनातून मृतदेह रुग्णालयात दाखल करत मदत कार्य केले. घटनेची माहिती परिसरात वाऱयासारखी पसरली. यानंतर नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. मयत अभिषेक हा गॅस एजन्सीवर कंत्राटी तत्त्वावर कामाला होता त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Copy