मिठाई फरसाण दुकानांना दिलेली शिथिलता रद्द

0

जळगाव : लाकॅडाऊनमध्ये शिथिलता देत फरसाण, मिठाईच्या दुकाने सुरू करण्यासंदर्भात देण्यात आलेली परवानगी मागे घेण्यात आली असून तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनला २० एप्रिलपासून शिथिलता देण्यात आली. त्यात फरसाण, मिठाईच्या दुकाने सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली होती. मात्र ही परवानगी रद्द करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी २१ एप्रिल रोजी काढले. या सोबतच ई कॉमर्स अत्यावश्यक वस्तू, अन्न औषधे व औषध उत्पादनाशी संबंधित घटक आणि वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची मुभा देण्यात आली, मात्र त्यासाठी कंपन्यांच्या वाहनांना संबंधित कार्यक्षेत्रातील इन्सिडेण्ट कमांडर (उपविभागीय अधिकारी, तहसीलदार) यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार असल्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Copy