माहेश्वरी जनकल्याण संस्थानचा सुवर्ण महोत्सव

0

आळंदी : श्री माहेश्वरी जनकल्याण संस्थान, पुणे या संस्थेचा स्वर्णमहोत्सव 2017 विविध कार्यक्रमांनी सामाजिक बांधिलकी जोपासत उत्साहात आळंदी येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथींमध्ये व्यासपीठावर मुंबई प्रदेश माहेश्वरी सभा प्रदेशाध्यक्ष विष्णुदासजी दरक, व्हा. चेअरमन व एम. डी. मुंबई सिडको भूषणजी गगराणी होते. या कार्यक्रमात संस्थेच्या 50 वर्षांचे वाटचालीतील प्रभावी विश्वस्त पदाधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन माहेश्वरी जनकल्याणाचे अध्यक्ष देवकिसनजी सारडा, कार्यकारी विश्वस्त मुकुंददासजी लोहिया (बाबूजी) यांचा सत्कार पूज्य बन्सीबाबा करवा सभागृहात हृदयस्पर्शी कौटुंबिक वातावरणात श्री माहेश्वरी समाज बांधवांचे उपस्थितीत करण्यात आला.

समाज विकासाचे कार्यात माहेश्वरी जनकल्याणाचे योगदान
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा तसेच श्री माहेश्वरी जनकल्याण संस्थानच्या कार्याचा गौरव करीत यापुढील काळात देखील समाज आणि संस्थानच्या विकासास हातभार लावण्याची ग्वाही दिली. अनेक मान्यवरांनी समाज विकासाचे कार्यात माहेश्वरी जनकल्याणाचे योगदान असल्याचे सांगत संस्थेच्या कार्याचा, प्रगतीचा लेखाजोखा मांडला. महाप्रसाद स्नेह भोजनाने हृदय स्पर्शी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता झाली.