Private Advt

माहेरी पत्नी पोहोचताच पतीसह नातेवाईकही धडकले : अट्रावल गावात तुफान राडा

यावल : पत्नी माहेरी गेल्याचा राग आल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने पत्नीसह कुटुंबियांनाच चोपून काढले. यावल तालुक्यातील अट्रावल येथे बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी एका कुटुंबातील सात जणांवर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्नी माहेरी गेल्याचा पतीला राग अनावर
अट्रावल, ता.यावल येथील सिंधुबाई सुनील भील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मनिषा प्रकाश भील ही गावातील सासरहुन अट्रावलमधील माहेरी निघून आली. या बाबीचा पती प्रकाश रामधन भील, रामधन नथ्थु भील, किसन रामधन भील, चंद्राबाई रामधन भील, नबाबाई जंगलु भील, इंदुबाई विलास कोळी व विमल प्रकाश भील (सर्व रा.अट्रावल) यांना राग आला व त्यांनी बुधवारी सायंकाळी फिर्यादीच्या घरासमोर येत फिर्यादीच्या घरत जावून फिर्यादीसाह फिर्यादीच्या दोन्ही मुली ललिता गोपाळ भील व मनिषा प्रकाश भील अशांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीची मुलगी ललिता हिच्या गळ्यातील पोत तोडून नुकसानही करण्यात आले. सात संशयीतांविरोधात यावल पोलिसात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास प्रभारी अधिकारी आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.