माहिती अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी

0

भुसावळ : येथील ग्लोबल ह्युमन राईटस् कौन्सिलतर्फे माहिती अधिकाराच्या रक्षणाबाबत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले व यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येवून माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर अन्याय करणार्‍या गुन्हेगारांवर फौजदारी खटले दाखल करण्यात येवून हे खटले ट्रिब्युनल अंतर्गत चालविण्यात यावे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यात येवून याअंतर्गत अत्याचार करणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन गुन्हेगारांना कडक शासन करावे, कार्यकर्त्यांवर धमकी दिल्यास किंवा त्यांच्या जीवास धोका असल्यास तयांना 24 तासात पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी कौन्सिलतर्फे निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

यांनी दिले निवेदन
या निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत मेणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांतसिंह ठाकूर, अतुल सावकारे, लखन पारधे, किरण सावकारे, अशोक पारधे, मयुरेश निंभोरे, श्रीकांत भोई, कुणाल बनसोडे, शेख बबलू शेख नुरा, कमलेश चंदन, देवेंद्र शिरनामे, विजय सपकाळे, गजानन सावकारे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहे.