Private Advt

मास्क न लावलेल्या प्रवाशांकडून अडीच लाखांचा दंड वसुल

भुसावळ : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना मास्क विनाच प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने मोहिम उघडली आहे. आतापर्यंत मास्क न लावणार्‍या दोन हजार 38 रेल्वे प्रवाशांकडून दोन लाख 32 हजार 750 रुपये दंड वसुल करण्यात आला तर दंडाच्या पावतीसोबत फेस मास्क देखील विनाशुल्क देण्यात आला. रेल्वेच्या या उपक्रमामुळे प्रवाश्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना साथीच्या रोगाची तीव्रताही समजेल, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. रेल्वे प्रवाशांनी स्टेशन परीसर आणि रेल्वे प्रवासादरम्यान फेस मास्क लावावा तसेच स्टेशन परीसर आणि गाड्यांमध्ये थुंकू नये व अस्वच्छता निर्माण करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.