मास्क न बांधणार्‍या दहा जणांना रावेर तहसीलदारांनी केला दंड

0

रावेर : रावेर शहरात तोंडाला मास्क न बांधणार्‍या दहा जणांवर तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी कारवाई करीत प्रत्येकाकडून पाचशे रुपयांप्रमाणे दहा हजार रुपये वसूल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सोमवारी महाराष्ट्र-मध्य प्रदेशाला लागून असलेल्या चोरवड सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन पाहणी केली व रावेरकडे येतांना तोंडाला मास्क न बांधणार्‍या 10 जणांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्या सोबत मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे हेदेखील उपस्थित होते.

Copy