माळी समाज अध्यक्षांसह नवीन पंच मंडळाची निवड

0

वरणगाव। येथील समस्त क्षत्रिय माळी समाज अध्यक्ष व पंच मंडळाची कार्यकारिणी निवडीची बैठक 3 रोजी श्री संत सावता माळी समाज मंदिरात घेण्यात आली. या बैठकीत 2017 ते 2022 या पाच वर्षांसाठी नवनिर्वाचित अध्यक्ष व पंच मंडळ यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला समाजातील मयत झालेले समाजबांधव यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून जमा खर्चास मंजुरी देण्यात आली. सोपान माळी यांच्या नावावर अध्यक्षपदी शिक्कामोर्तब केले व त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – सचिव ज्ञानेश्‍वर माळी, पंच गोविंदा माळी, विश्‍वनाथ माळी, अशोक माळी, नितीन माळी, संतोष माळी, रामदास माळी, निलेश माळी, संजय माळी, जगन्नाथ माळी, भगवान माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच या बैठकीत माळी समाज युवा संघटनेची कार्यकारिणीदेखील घोषीत करण्यात आली ती पुढीलप्रमाणे – अध्यक्ष दिपक माळी, उपाध्यक्ष पंकज माळी, सचिव सचिन माळी, सदस्य नरेंद्र माळी, टिनू माळी, दिपक माळी, विकास माळी, प्रशांत माळी यांची युवा कार्यकारिणीत निवड झाली. या बैठकीत 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.