Private Advt

मालोदला भिंत कोसळली : बालकाचा मृत्यू

संततधार पाऊस सुरू असल्याने मातीची भिंत चिमुकल्याच्या अंगावर कोसळली : मालोद गावात पसरली शोककळा

यावल : तालुक्यातील मालोद येथे पावसात घराची भिंत कोसळल्याने त्या खाली दबले जावून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. आबीद इमाम तडवी (4) असे मयत बालकाचे नाव आहे. या घटनेने मालोद येथे हळहळ व्यक्त करण्यात आली.

अचानक कोसळली भिंत
यावल तालुक्यातील मालोद या आदिवासी गावता रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ईमाम दगडु तडवी यांच्या घरातील मातीची भिंत ही वेगाने सुरू असलेल्या पाऊसामुळे अचानक भिंत आबीद इमाम तडवी या बालकाच्या अंगावर कोसळल्याने आबीदचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी कोसळलेल्या भिंतीच्या ढिगार्‍यातुन चार वर्षीय बालकाचा मृतदेह बाहेर काढला. मालोद गावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली. मयत बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिळके यांनी केले. मयत बालकाचे वडील इमाम दगडु तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलिसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास सहा.फौजदार विजय पाचपोळे करीत आहे. मालोद येथील तलाठी तेमरसिंग बारेला यांनी तत्काळ घटनास्थळी येत पंचनामा केला.