Private Advt

मालोदच्या बेपत्ता वृध्देचा विहिरीत आढळला मृतदेह

यावल : तालुक्यातील मालोद येथील बेपत्ता झालेल्या 85 वर्षीय वृध्देचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. बुधवार, 16 मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. येसूबाई नामदार तडवी (75, मालोद, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.

चार दिवसांपासून वृद्धा बेपत्ता
येसूबाई नामदार तडवी (85, मालोद) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून शनिवार, 12 मार्च रोजी मुलीकडे जावून येते, असे सांगून सकाळी 10 वाजता घराबाहेर पडल्या मात्र सायंकाळनंतरही त्या मुलीकडे पोहोचल्या नाही तर बुधवार , 16 मार्च रोजी सकाळी गावातील अरमान तडवी यांच्या शेतातील विहिरीतून दुर्गंधी सुटल्यानंतर खातरजमा केली असता वृद्धेचा मृतदेह आढळला. तडवी यांनी आत्महत्या केली की त्या विहिरीत पडल्या? याबाबतचा तपास यावल पोलिसांकडून केला जात आहे.

पोलिस प्रशासनाची धाव
यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह वैद्यकिय पथकाने धाव घेतली. या प्रकरणी दगडू रमजान तडवी (54, रा.मालोद, ता.यावल) यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहे.