मालेगाव बंदोबस्ताला दांडी ; जिल्हा मुख्यालयातील दोन पोलीस निलंबित

0

जळगाव– मालेगाव बंदोबस्तावर नियुक्त केले असतांना, मालेगावात हजर न होता, परस्पर दांडी मारणार्‍या जिल्हा मुख्यालयातील सोनजी सुभाष कोळी व महेंद्र प्रकाश शिंपी या दोन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी गैरहजर असल्याने तीन पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

जळगाव जिल्हयातुन मालेगाव येथे 110 पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरीता पाठविण्यात आले हेाते. त्यापैकी जिल्हा मुख्यालयात नेमणुकीस असलेले सोनजी कोळी व महेंद्र शिंपी हे दोघे नेमुन दिलेल्या कर्तव्याचे ठिकाणी हजर न झाल्याने गैरहजर आढळून आले. संबंधित कर्मचार्‍यांचा रिपोर्ट पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी याबाबत अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना चौकशीच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार त्यांनी सोनजी कोळी, व महेंद्र शिंपी या दोघांची चौकशी करुन त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार डॉ. पंजाबराव उगले यांनी दोघांना निलंबित केले असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या आठवड्यात तीन कर्मचारी निलंबित

मालेगाव बंदोबस्ताच्या ठिकाणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कॉ. सुरेश रुपा पवार, मुख्यालयाचे प्रसाद सुरेश जोशी व परवेझ रईस शेख,
मुख्यालयाचे सोनजी सुभाष कोळी हे पोलीस कर्मचारी हे त्यांना नेमुन दिलेल्या कर्तव्याचे ठिकाणी गैरहजर आढळून आले. तसेच वरिष्ठांची परवानगी न घेताच जळगावात प्रवेश केला होता. अपर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करुन अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी 25 एप्रिल रोजी सुरेश पवार, प्रसाद जोशी व परवेझ रईस शेख यांना निलंबित केले होते.

Copy