मालेगावमध्ये २४ तासांत १८ नवे रूग्ण

0

उत्तर महाराष्ट्रात मालेगाव ठरले करोनाचे केंद्रबिंदू

नाशिक – मालेगावमधील करोनाच्या रूग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. रविवारी सकाळी मालेगावमध्ये पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आता दुपारी १२ वाजता आणखी १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मालेगावात दिवसभरात १८ नवे करोचे रूग्ण आढळले आहेत. आजच्या १८ नव्या रूग्णांमुळे मालेगावातीली करोना बाधितांची संख्या २७ झाला आहे. त्यापैकी एका करोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रात मालेगाव हे करोनाचे केंद्रबिंदू ठरल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवसांमध्ये मालेगाव मधून २७ नवे रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे. मालेगावमुळे नाशिक जिल्ह्याच्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये करोनाबाधितांची एकूण संख्या ३२ झाली आहे. नाशिक शहरात तीन, निफाड आणि चंदवडमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण आढळला आहे. निफाडमधील एक रूग्ण पुर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला होम क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे चार दिवस पूर्णतः लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Copy