मालमत्तेसाठी विधवा असल्याचा बनाव

संशयितांमध्ये एरंडोलच्या महिलेचा समावेश

एरंडोल: पहीला पती हयात असतांना विधवा असल्याची खोटी माहीती विवाह निबंधक कार्यालय एरंडोल यांच्याकडे देऊन ज्योती दगडू पाटील (रा. बोराडी ता.शिरपूर जि. धुळे, हल्ली मुक्काम हनुमंतखेडे सीम), दगडू आत्माराम पाटील (रा. बोराडी ता.शिरपूर जि. धुळे,भास्कर गजानन पाटील रा.हनुमंतखेडे सीम ता. एरंडोल) या आरोपींनी संगनमताने वडीलोपार्जित मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशाने फसवणुक केल्याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, महेश भास्करराव पाटील (रा. समर्थ अपार्टमेंट, कर्मयोगी नगर,नाशिक) यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार ज्योती दगडू पाटील हीचा पती रविंद्र शंकर पवार रा. जवखेडे रा.शिरपूर हे हयात असतांना ही माहीती जाणीवपूर्वक लपवून फिर्यादीची वडीलोपार्जित मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशाने ज्योती पाटील ह्या विधवा असल्याची खोटी माहीती देऊन भास्कर गजानन पाटील यांचेशी विवाह केला व विवाहाची नोंदणी दि. ३/७/२००७ रोजी विवाह निबंधक कार्यालय एरंडोल येथे करण्यात आली. या वेळी दगडू आत्माराम पाटील हे साक्षिदार म्हणून हजर होते. दरम्यान वडीलोपार्जित मिळकत गिळंकृत करण्यासाठी संशयितांनी फसवणुक केल्याप्रकरणी महेश भास्करराव पाटील यांनी एरंडोल पोलीसात तक्रार केली आहे. याबाबत भाग ५ भा द वी कलम ४२०,४६५,४६८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक दहीफळे, संदीप सातपुते, राहूल बैसाणे हे पुढील तपास करीत आहेत.

Copy