मालमत्ता कर जून अखेर भरल्यास 10 टक्के सूट

0

जळगाव– आर्थिक वर्षात मालमत्ता कराचा भरणा 30 जूनपर्यंत केल्यास 10 टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.

मनपा हद्दीतील मिळकत धारकांना मालमत्ता कर 30 एप्रिल पर्यंत भरणा केल्यास 10 टक्के सूट (थकबाकीदार वगळून) देण्याची आयुक्तांनी जाहीर केले होते. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गर्दी टाळण्यासाठी भरणा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यामुळे सवलतीची वाढविण्यात आली असून मिळकतधारकांनी 30 जूनपर्यंत भरणा केल्यास 10 टक्के सूट देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले.मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन http://www.jcmc.gov.in/english/ भरता येणार आहे.

Copy