मार्श ऐवजी मॅक्सवेलला तिसर्‍या कसोटीत संधी?

0

मुंबई । कंगारू संघाला दोन कसोटी नंतर दोन धक्के बसले आहे.त्याचे दोन महत्वाचे खेळाडू दुखापतीनंतर मायदेशी परतले आहे. त्यामुळे भारत दौर्‍यातल्या तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळवण्यासाठी मार्कस स्टॉईनिस आणि ग्लेन मॅक्सवेल या व्हिक्टोरियाच्या खेळाडूंमध्ये चुरस आहे. मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला सहाव्या क्रमांकावर एखाद्या अष्टपैलू शिलेदाराची गरज आहे.

स्टॉईनिसची अष्टपैलू गुणवत्ता
ग्लेन मॅक्सवेल हा आधीपासूनच ऑस्ट्रेलिया संघाचा घटक आहे. त्याचा त्याला लाभ होऊ शकतो. पण स्टॉईनिसची अष्टपैलू गुणवत्ता आणि प्रामुख्याने त्याचं स्विंग गोलंदाजीतलं कौशल्यही दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही.दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघातल्या वाढत्या दुखापती लक्षात घेता अ‍ॅश्टन अ‍ॅगर आणि उस्मान ख्वाजा यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या बोर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीच्या मालिकेची तिसरी कसोटी 16 मार्चपासून रांचीमध्ये खेळवली जाणार असून, झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममधला हा पहिलाच कसोटी सामना ठरणार आहे.