मारिया शारापोव्हा एकटीच अमेरिकेतील हवाई बेटांवर

0

मॉस्को: रशियाची टेनिस स्टार मारिया शारापोव्हा सध्या कुठे आहे? ती काय करतेय? हे कुणालाच माहिती नाही. लाईमलाईट तसेच मिडीयापासूनही दूर राहणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे. मात्र नुकतेच अमेरिकेतील हवाई बेटांवर एकटीच नववर्षाची सुटी साजरी करत असताना तिला पाहिले गेले आहे. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर झळकले आहेत. तिच्यावर अमली पदार्थ सेवन प्रकरणात दोषी ठरल्याने दोन वर्षांची बंदी घातली आहे.

वापसीकडे सर्वांचे लक्ष
मारियावर बंदी असलेले औषध सेवन केल्याप्रकरणी दोषी धरून दोन वर्षाची बंदी घातली गेली होती. नंतर आक्टोबरमध्ये ही बंदी १५ महिन्यांवर आणली गेली आहे. २५ एप्रिल रोजी तिच्यावरील बंदी संपुष्टात येणार आहे. तो पर्यंत मारियाने प्रसार माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले आहे. इतकेच नव्हे तर तिच्यासोबत हवाई बेटांवर मित्रमैत्रिणीही नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या ती खेळापासून पूर्णपणे दूर असून एकटीच राहणे पसंत करत आहे. आता लवकरच तिच्यावरील बंदी संपणार असून ती वापसी कशी करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.