मारिने भारतीय महिला हॉकीचे मुख्य कोच

0

नवी दिल्ली : नेदरलँड महिला हॉकी संघाचे माजी कोच शोर्ड मारिने यांची हॉकी इंडियाने भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी पुढील चार वर्षांसाठी नियुक्ती केली. मारिने हे सिनियर महिला हॉकी संघाचे विश्लेषक कोच असलेले एरिक वोनिक यांच्यासोबत काम पाहतील.

दोन्ही कोच भोपाळमध्ये सुरू असलेल्या सिनियर महिला संघाच्या राष्ट्रीय शिबिरात दाखल झाले आहेत. मारिने म्हणाले,‘भारतीय महिला हॉकी संघ फारच प्रतिभावान आहे. या मेहनती मुलींना प्रशिक्षण देण्यास मी उत्साहित आहे. या संघात बलाढ्य संघ बनण्याची कुवत आहे.’ मारिने नेदरलँडसाठी खेळले असून २१ वर्षांखालील राष्ट्रीय संघाला त्यांनी कोच या नात्याने विश्वचषक जिंकून दिला.