मारहाणीतील दोन संशयितांना अटक

0

जळगाव । हरीविठ्ठलनगरात 11 फेब्रुवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पुर्ववैमनस्यातून दोन तरूणांना बंदुकीचा धाक दाखवून तलवारीने वार करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात 9 जणांच्या विरोधात दंगलीचा, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अगोदर पाच संशयिताना पोलिसांनी अटक केली होती. गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास या प्रकरणातील आणखी दोन संशयीताना उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या पथकाने अटक केली आहे.

हरिविठ्ठल नगरातून घेतले ताब्यात
हरीविठ्ठलनगरात 2015 साली नवरात्रोत्सवात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. तेव्हापासून या दोन्ही गटात नेहमीच वाद सुरू असतात. 11 फेब्रुवारीला संदीप अशोक यशोद आणि आकाश दिलीप मोरे यांना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास हरीविठ्ठलनगर चौकात राहूल सुरेश हटकर, प्रमोद इंगळे, कैलास हटकर, बंटी राजू कोळी, राजू धोंडू कोळी, गेंडा तडवी, ललीत देवरे, मॉण्टी कोळी, पंकज कुमावत यांनी मारहाण केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दंगल, अ‍ॅट्रॉसिटी, जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी राहूल हटकर, बंटी कोळी, राजू कोळी, पवन कुमावत आणि गेंडा तडवी यांना अटक करण्यात आली होती. मात्र उर्वरीत संशयीत फरार होते. या प्रकरणी उप विभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पथक संशयिताना अटक करण्यासाठी पाठविले होते. मात्र, गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हरीविठ्ठलनगरातून पोलिसांच्या पथकाने कैलास हटकर आणि प्रमोद इंगळे यांना अटक केली.