Private Advt

मारहाणीचा जाब विचारताच तरुणावर हल्ला : तिघांविरोधात गुन्हा

जळगाव : मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
दिव्यकांत विक्की बागडे (17, रा.जाखणी नगर, कंजरवाडा, जळगाव) हा भाऊ घनश्याम विक्की बागडे, आई निलम बागडे यांच्यासह वास्तव्याला आहे. रविवार, 10 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता धनश्याम बागडे याला कासमवाडी येथे ललित दिक्षीत, भोजा आणि मयूर (पुर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. कासमवाडी, जळगाव) यांनी काहीही कारण नसतांना मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी दिव्यकांत बागडे हा गेला असता तिघांनी मारहाण केली. यात ललित दिक्षीतने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याराने वार करून दिव्यकांत याला जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दिव्यकांतची आई निलम बागडे यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली व जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी सोमवार, 11 एप्रिल रोजी दिव्यकांत बागडे याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर आरोपी ललित दीक्षीत, भोजा आणि मयूर (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.कासमवाडी) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुनील सोनार करीत आहे.