मारवड पोलीस ठाण्याच्या लाचखोर पोलीस नाईकाची पोलीस कोठडीत रवानगी

अमळनेर : विनयभंगाच्या गुन्ह्यात तपासात मदत करण्यासह चार्जशीट पाठवण्यासाठी 15 हजारांची लाच मागणी करून ती स्वीकारणार्‍या मारवड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण (51, रा.जुनी पोलीस लाईन, अमळनेर) यास जळगाव एसीबीच्या पथकाने शनिवारी सायंकाळी अमळनेर शहरातील पोलीस लाईनमधील राहत्या घरीच अटक केली होती. आरोपीस रविवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची (26 ऑक्टोबर) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

15 हजारांची लाच भोवली
अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील 45 वर्षीय तक्रारदार, त्यांचे वडील व भाऊ यांच्याविरोधात मारवड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करून या गुन्ह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात संशयीत आरोपी पोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण यांनी शनिवार, 23 रोजी 15 हजारांची लाच मागणी करीत ती राहत्या घरी स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने अटक केली होती. आरोपीस रविवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची अर्थात 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास जळगाव पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.

Copy