माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजपावर हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या बलात्काराबद्दल सरकारवर टीका करताना एका सभेत ‘मेक इन इंडिया’चा प्रवास ‘रेप इन इंडिया’च्या दिशेनं सुरू असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून राहुल यांनी देशाची माफी माग्वाई अशी मागणी भाजपाच्या खासदारांनी केली होती. या वर राहुल यांनी ‘सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जातेय. मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. त्यामुळं मी घाबरणार नाही. माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी असल्याचे म्हटले आहे.

सुधारीत नागरिकत्व कायदा, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात काँग्रेसनं नवी दिल्ली रामलीला मैदानावर ‘भारत बचाव’ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना राहुल यांनी अत्यंत आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता घाबरत नाही. काँग्रेसवाले ‘बब्बर शेर’ आहेत. देशासाठी जीव द्यायलाही आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी याआधीही सावरकरांवर टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासही काँग्रेसनं विरोध केला होता. आता पुन्हा एकदा राहुल यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Copy