मान्सून चार दिवस उशिराने येणार

0

नवी दिल्ली – मान्सून केरळात चार दिवस उशिराने येऊ शकतो असा सुधारित अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तो 5 जूनपर्यंत किंवा चार-पाच दिवस मागेपुढे केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

याआधी मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. केरळमध्ये मान्सूनचे आगमन होताच देशात चार महिन्यांच्या पावसाळ्याला सुरुवात होते. हवामान खात्याने एप्रिलमध्ये पावसाचा पहिला अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार यावर्षी पाऊस सामान्य राहणार आहे. पावसाची दीर्घ मुदतीची सरासरी 100% असेल. 96 ते 100% पाऊस हा सामान्य मान्सून मानला जातो.

Copy